गडमुडशिंगी, ता. करवीर येथे थेटपाईप लाईन कामाचा शुभारंभ

▪गडमुडशिंगी ता.करवीर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये खर्चाची उचगाव हद्दीतुन पंचगंगा नदी ते गडमुडशिंगी पर्यंत थेट पाईपलाईन करून पाणी आणणेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

▪ या कामाचा शुभारंभ गावच्या सरपंच आक्काताई संजय सातपुते व उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

▪१२ इंच व्यासाची व सुमारे ३.७ कि.मी. लाब असणाऱ्या या पाईपलाईन योजनेतून प्रती मिनिट ४५०० लिटर इतका पाणी उपसा होणार असलेने गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

▪या कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य अशोक दांगट, पांडुरंग कांबळे , जितेंद्र यशवंत, कृष्णात रेवडे, संजय सातपुते, संजय कामिरे, अमित माळी, ग्रा.वि.अ. आर. एन. गाढवे, गितेश डकरे, रणजीत राशिवडे, बाबासो पाटील, अनिल पाटील चंद्रशेखर पाटील, प्रताप पाटील, सुधाकर पाटील, विष्णू पाटील, मनिष पाटील, सचिन पाटील, उमराव मगदूम, बाबासो रानगे मनोज चौगुले, पिंटू पणूत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–