मासिक पाळी तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींची अंडरगारमेंट्स उतरऊन चेकिंग; महिला आयोगाची दखल


▪भूज: मासिकपाळी बद्दल समाजात अनेक गैरसमजुती आहेत. मुलगी वयात आल्यानंतर तिला मासिकपाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट असतानाही अनेक ठिकाणी आजही या मासिक पाळीबाबत अनेक गोष्टी पाळण्याची प्रथा आहे. या प्रथा आणि नियमांपुढे अनेकवेळा स्त्रियांना शरमेने मान खाली घालावी लागते. असाच धक्कादायक प्रकार भुजमध्ये घडला. मुलींची मासिक पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना वॉशरूममध्ये नेऊन अंडरगारमेंट्स उतरवायला सांगण्यात आले.

▪गुजरातमधील कच्छ भुज येथे स्वामीनारायण संप्रदायाची सहजानंद गर्ल इन्स्टीट्यूट आहे. संस्थेच्या वसतिगृहामध्ये मुलींच्या मासिकपाळी संदर्भात काही कठोर नियम पाळले जातात. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षा देखील केली जाते. मुलींना मासिक पाळीदरम्यान वेगळं बसवलं जातं. मात्र मुली नियम मोडत असल्याचा आरोप वसतिगृहाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केला.

▪या आरोपानंतर मुलींना खरंच मासिक पाळी आहे की नाही हे तपासण्यासाठी बाथरुममध्ये नेऊन कपडे उतरवण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

▪दरम्यान तिथल्या विद्यार्थिनींनी या घटनेचा कडाडून विरोध केला. सर्व नियम पाळूनही अशा प्रकारे तपासणी करणं गैर असल्याचा आरोप संस्थाचालकांवर लावण्यात आला आहे.

▪विद्यार्थिनींनी केलेल्या विरोधामुळे त्यांना वसतिगृहातून काढलं जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी संस्थेनं बचावात्मक भूमिका घेतली आहे. तर आम्ही नियम पाळत असूनही आमच्यावर आरोपी करण्यात आले आणि आम्ही गैर पद्धतीनं तपासणीही करण्यात आल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन संस्थाचालकांनी विद्यार्थिनींना दिलं आहे.

_*महिला आयोगाने घेतली दखल*_

▪राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली असून स्वतःहूनच तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आयोगाची चौकशी समिती या इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी करेल.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–