दिल्लीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण काय बोलावं : शरद पवार

▪कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण काय बोलावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. चिठ्ठ्या वाटल्याबाबत खरं काय आणि खोटं काय माहित नाही. पण वर्तमानपत्रात वाचलं होतं, असंही सांगायला पवार विसरले नाहीत.

▪दिल्ली विधानसभा निवडणुक निकालानंतर पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले की, ‘काँग्रेसने दिल्लीत आप सोबत भाजपला हरवण्यासाठी हातमिळवणी केली होती.’ शिवाय ‘आप’ला मिळालेल्या यशात पवारांचं काहीही योगदान नाही, त्यामुळे त्यांनी त्याचा टेंभा मिरवू नये, असा सल्लाही पाटलांनी दिला होता.

▪ ‘गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असूनही पवारांना १० च्या वर खासदार निवडून आणता आले नाही. पण तरीही ते राजकारणात केंद्रबिंदू कसे काय असतात?’ असा सवाल करत त्यांच्यावर आपण पीएचडी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. 

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–