भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास राज्य सरकारची हरकत नाही

मुंबई : गेल्या महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तडकाफडकी भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्याच्या पोलिसांकडून काढून घेऊन स्वत:कडे घेतला होता. महाविकासआघाडी सरकारने त्यावर टिका व आक्षेप घेतला होता.

गुरुवारी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी अतिरिक्त गृहसचिव संजय कुमार यांनी पीटीआयला सांगितले, की राज्याच्या गृहखात्याने भीमा –कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएने घेतल्यास महाविकासआघाडीची काही हरकत नाही असे कळवले आहे.

गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला तपास करण्याचा अधिकार असतो पण त्या आधी राज्य सरकारशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले पाहिजे असे विधान केले होते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सेशन कोर्टात एनआयएने एक अर्ज दाखल करून भीमा-कोरेगाव प्रकरणातील पुराव्याची सर्व कागदपत्रे पुणे पोलिसांनी मुंबईतील एनआयए कोर्टाकडे द्यावीत अशी विनंती केली होती.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–