जाणून घ्या व्हॅलेंटाइन डे ची सुरवात कधी झाली???

प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाइन डे ओळखला जातो. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास रोम राज्यातून सुरुवात झाली होती.

रोममध्ये केलेडियस द्वितीय राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. ह्या राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती.

संत व्हॅलेंटाइनने या नियमाला विरोध केला व काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.
तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनला जेलरच्या मुलीवर प्रेम झाले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–