आणि शिरोली सरपंचांनी स्वतः मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम घेतले हाती….

_ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बरोबर केले काम_

▪शिरोली पुलाची येथे ग्रामपंचायत जवळील हनुमान मंदिर जीर्णोद्धार चा विषय खूप वर्षा पासून प्रलंबित होता.प्रत्येक निवडणुकी मध्ये गावातील दोन्ही गट मंदिराचा जीर्णोद्धार बाबत गावकऱ्यांना आश्र्वत करत असत.पण आज लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला सुरुवात केली.

▪ सरपंच पदी निवड झाल्यावर त्यांनी पहिली सही ही मंदिराच्या जीर्णोद्धार कागदपत्रांवर केली होती.तेव्हा पासून जीर्णोद्धार साठी सर्वांचे प्रयत्न चालू होते. आज त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समवेत स्वतः मंदिरावर चढून  मंदिराच्या खापऱ्या उतरवल्या.त्यामुळे कर्मचारी ही त्यांचे काम पाहून भारावून गेले.

▪हनुमान मंदिर जीर्णोद्धार साठी गावातील सर्वच लोकांनी गट तट न पाहता देणगी ग्रामपंचायत कडे जमा केली आहे. ग्रामपंचयतीमार्फत मार्फत देणगी दिलेल्या लोकांची नावे देखील डिजिटल फलक लावून प्रसिद्ध केली होती.

▪यावेळी त्यांच्याबरोबर केमिस्ट असोशियन चे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे ,  उद्योजक राहुल खवरे,शिवसेना नेते राजकुमार पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
———-

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–