इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जावयाच्या हाती ब्रिटनच्या तिजोरीची चावी

▪लंडन: ब्रिटनच्या तिजोरीची चावी आता  इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जावयाच्या हाती असणार आहेत. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ म्हणजेच अर्थमंत्र्याच्या समकक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

▪सध्या सुनाक ट्रेजरी विभागाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. सुनाक यांच्या नियुक्तीची माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आली आहे. बोरिस जॉनसन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

▪ सुनाक यांच्यासह भारतीय वंशाच्या गृह सचिव प्रीती पटेल यांचीही ‘चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन भारतीय वंशांच्या अधिकाऱ्यांकडे ब्रिटनच्या अर्थ खात्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–