अतिवृष्टी, पूरबाधितांचे ५२५ कोटी पीक कर्ज होणार माफ : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

▪गतवर्षीच्या जुलै-ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे 525 कोटींचे पीक कर्ज माफ करण्यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

▪कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसह अन्य काही जिल्ह्यांत गेल्यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले होते. त्यामुळे लाखो लोकांचे नुकसान झाले. शेतीतील उभी पिके पाण्यात सडली, माती वाहून गेल्याने जमिनीचा पोतही बिघडला आहे.

▪ 525 कोटी पैकी सर्वाधिक पीक कर्ज 295 कोटी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सांगली जिल्ह्यात 105 कोटींचे कर्ज आहे. या 525 कोटींपैकी 300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार असून, बाकीची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–