ज्या गावाने सत्कार केला त्याच गावाला मंत्री सतेज पाटील यांनी दाखवला कात्रजचा घाट


_शिरोलीचा साठ लाख निधी रुकडीला_

▪मंत्री सतेज पाटील यांचा गेल्या आठवड्यात शिरोली मधील त्यांच्या ग्रामपंचायत सत्ताधारी समर्थकांनी सत्कार केला या सत्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांनी शिरोली बद्दल असलेले प्रेम व नाते अतूट असल्याचे नमूद केले होते.

▪ पण आता काही दिवसांतच त्यांच्याच ताब्यात असलेली जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांनी शिरोली मतदारसंघाचा सुमारे साठ लाख निधी जो माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी गावासाठी आणला होता तो रुकडी मतदारसंघात वळवल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने प्रसिद्ध केले आहे.

▪आता ज्यांनी त्यांचा गावात सत्कार केला ते आता सतेज पाटील यांच्या पुढे मुग गिळून गप्प बसणार की गावांसाठी पुन्हा निधी जावून खेचून आणणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

💫 _प्रतिक्रिया_

_शिरोलितील निधी रुकडी मतदारसंघात वळणवण्यात आला याचे मला दुःख नाही.दोन्ही मतदारसंघ एकाच तालुक्यातील आहेत त्यामुळे दोन्ही मध्ये मी दूजाभाव मानत नाही परंतु तालुक्यामधून फक्त माझाच निधीमध्ये कपात करण्यात आले हे मात्र संशयास्पद बाब आहे. एवढीच निधीची आवश्यकता होती तर तालुक्यातून प्रत्येक सदस्यांच्या निधीतून कपात करणे व्यवहारी ठरत होते – माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक_

_गावचे सत्ताधारी आजपर्यंत कायम महाडिक हे गावसाठी विकास निधी देत नाहीत असे सगळीकडे खोटे नाटे सांगत असतात. आता गावात जी कोट्यावधी रक्कमेची विकास कामे चालू आहेत ती सर्व कामे महाडिक यांच्या निधीतून प्रयत्नातून आलेली आहेत व आता परत गेलेला निधी देखील त्यांनीच दिलेला होता . पण हा निधी सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांनी काढून घेतला. सत्कार सोहळ्यात नेत्यांनी गावाबद्दल असलेली आस्था बोलून दाखवली पण आता झालेल्या प्रकारामुळे त्यांना “सूर्याजी पिसाळ” ही कोल्हापूर ने दिलेली उपमा सार्थक ठरते हे सिद्ध झाले आहे. – कृष्णात उर्फ पिंटू करपे , माजी उपसरपंच शिरोली_

_जोपर्यंत गेलेला निधी परत येत नाही तोपर्यंत राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी शिरोलीकरांकडे मते मागण्याचा अधिकार सुध्दा मंत्री सतेज पाटील यांना नाही तसेच ग्रामपंचायत सत्ताधारी वर्गाने ज्या हिरहिरिने मंत्री महोदयांचा  सत्कार केला त्याच हिरहिरीने गेलेला निधी खेचून आणावा -पुष्पा पाटील ,ग्रामपंचायत सदस्या शिरोली_

_तालुक्यातील आताच्या विरोधकांना महाडिक यांनीच आता पर्यंत राजकारणात तारले आहे प्रत्येक वेळी महाडिक नावाचा वापर करून त्यांनी मते मागितले आहेत आताही महाडिक यांचा निधी स्वतः कडे वळवत महाडिक यांच्याच सावलीची त्यांना गरज असल्याचं त्यांनी दाखवून दिले – संदीप तानवडे, शिरोली_

_आम्ही पालकमंत्री सतेज पाटील यांना भेटून पुन्हा निधी आणण्याचा प्रयत्न करू – महेश चव्हाण ,माजी जि. प.सदस्य शिरोली._
——————

Advertisements