कागल येथे राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलेंडर ट्रकला भीषण आग

▪ आज बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास कोल्हापूर कडून कागलकडे गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला लक्ष्मी टेकडी कागल जवळ अचानक आग लागली. घटनेची माहिती कागल पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी कागल नगर परिषद कागल चे नगरसेवक नितीन दिंडे यांना घटनेची माहिती दिली.

▪दिंडे यांनी कागल नगर परिषद कागल अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. तसेच पंचतारांकित एमआयडीसी मधील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पेटत्या ट्रक जवळ शाळकरी मुलांच्या शैक्षणिक सहलीची बस होती. ती सर्वप्रथम पोलिसांनी बाजूला काढली.

▪अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. तसेच पोलीस प्रशासनाने वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली.

▪ महामार्गावर वाहने न थांबवता महामार्गाच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली. कागल नगर परिषद कागल व पोलिस प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे महामार्गावर कोणतीही जीवित हाणी घडली नाही.

Advertisements