व्हॅलेंटाईन वीक स्पेशल : प्रेम म्हणजे काय ?

 ▪नमस्कार मित्रांनो १४ फेब्रुवारी हि तारीख जसजशी जवळ येते तशी आपल्या मनाची उत्सुकता शिगेला पोहचते. तरुणीशी सगळ्यात जास्त कनेक्टेड कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम. व त्याच प्रेमाचा दिवस म्हणजे valentine डे. पण आज कालच प्रेम हे फक्त तरुणाई पुरतच मर्यादित आहे असच चित्र निर्माण झाल आहे. तरुण आणि तरुणी यांच्यातील प्रेम हे प्रेमाचे एक रूप झाल. पन अशी अनेक कित्येक रूप या प्रेमाची आपल्या सभोवताली आहेत, गरज आहे ते ओळखण्याची. मग ते नवरा बायकोच प्रेम असो, आजी आजोबांचं असो, अथवा मायेन जवळ घेणाऱ्या आईच अन पहिलं पावूल टाकायला शिकवणाऱ्या बाबांचं, नुकत्याच जन्माला आलेल्या वासरास मायेची ऊब देणाऱ्या त्या गोमातेच. 

▪ प्रेम या एका शब्दात खूप मोठी ताकद आहे. एखाद्या वेड्यास शहान करण्याच तर एखाद्या शहाण्यास पूर्णपणे वेड बनवण्याची. मनातील भावनांचा अफाट सागर म्हणजे प्रेम. याच प्रेमाची कित्येक रूप आणस पाहायला मिळतात. गरज आहे ती त्या प्रेमाची प्रचिति येण्याची.  

 ▪तरुण वयात उमलणाऱ्या प्रेमाचे किती गोडवे गावेत ? या प्रेमात दोघेच  राजा अन राणी. एक तो अन एक ती. एकमेकांसाठीच बनलेले, एकत्र आलेले ते जीवन मरणाच्या शपथ घेतात. किती त्या प्रेमाची ताकद, जी जगण्यास बळ देत असते. ती म्हणते त्याला पाहिल्याशिवाय मला करमत नाही अन तो म्हणतो तिच्याविना मला राहवत नाही. सार काही नजरेतून व्यक्त होत असत. ‘पहला पहला प्यार’ अस गुणगुणणारा सलमान अन ‘मुझसे जुदा’ होकर म्हणणारी माधुरी हे जणू या प्रेमवीरांचे आयडॉलच. तो दिसला नाही तर ती कावरीबावरी होते तर ती दिसली नाही तर याला वेड लागते.  पण प्रत्येकालाच अस प्रेम मिळत नाही. पण नैराश्यास दूर सारून सभोवतालच्या जगातील प्रेमाचा शोध घेतला तर नक्कीच यशाचे शिखर दिसू लागते व सुखमय जीवनाचा मार्ग दिसतो.

▪लग्न होऊन ती सासरी येते. नवीन घरात थोडी कावरीबावरी होते. पण तो तिला दिलासा देतो अन सप्तफेऱ्यांच्या वेळी घेतलेल्या शपथे नुसार तिच्या सुख दुखाः त सहभागी होतो. ती देखील आपल्या माहेरच्या आठवणीत जास्त न गुरफटता संसारात लक्ष देते. नवऱ्यास आवडणारा पदार्थ मुद्दाम शिकून घेते. तो ऑफिस मध्ये दिवसभर काम करून घरी परतताना बायकोसाठी नवी कोरी साडी आणतो. पण घरी आल्यावर मळकट साडीतील बायकोला तितक्याच प्रेमाने कतरिना म्हणतो, दोन चार गोड शब्द बोलून तिचा थकवा दूर करण्याच्या प्रयत्न करतो. दोघेही संसारासाठी खस्ता खात असतात व संसाराची गाडी एकसमान खांद्यावरून पुढे नेत असतात.   

▪वय झाल तरी प्रेम कधी वयस्कर  होत नाही. अमृतासारख ते सदैव चिरतरुणच राहत. याची प्रचीती आपणास आजी आजोबांच्या प्रेमातून येते. फिरायला गेलेले आजोबा न   चुकता आजीसाठी गजरा  घेऊन येतात अन तो आजीच्या केसात माळतात आन “वो मेरी जोहरा जबी “गुणगुणतात, तर तीच आजी आजोबांना आजही आपला देवानंद म्हणत असते. खरच काय म्हणावं काय या प्रेमाला?
  
▪तर मित्रानो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरून आपणास प्रेम दिसतच, व म्हणूनच आपल  जीवन सुखमय व आनंददायी  बनत. तेव्हा प्रेम या शब्दाचा गैर अर्थ काढणाऱ्या, या शब्दास कलंक लावणाऱ्या गैर प्रवृत्तींना विरोध करणे हे गरजेचे बनले आहे व तेव्हा कुठे या प्रेमाचे पावित्र्य जपले जाईल. प्रेम करणारी  माणस  व प्रेम करणारी मन यामुळेच प्रेमाचा वटवृक्ष बहरतो. 

  सचिन लोंढे पाटील   – 8552974533

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–