अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

श्री परब म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्‍चित केला असून यात 18 दिवस कामकाज होणार आहे.

गुरुवार दि. 6 मार्च 2020 रोजी सन 2020- 21 या वर्षात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी सन 2019 20 च्या पुरवणी मागण्या तसेच सन 2014 -2015, सन 2015- 16, व 2016 – 17 या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील.

Advertisements