निलोफर आजरेकर होणार नवीन महापौर..?

▪ कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर आज फुटला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापौर पदासाठी कॉमर्स कॉलेज प्रभागाच्या नगरसेविका सौ. निलोफर अश्कीन आजरेकर यांचे नाव घोषित केल्याने महापौर पदी त्यांची निवड हि केवळ औपाचारिकता राहिली आहे.

▪महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. यंदाच्या पंचवार्षिक सभागृहातील शेवटचे असल्याने इच्छुकांनी आपल्यालाच महापौरपदी संधी मिळावी यासाठी मोठी फिल्डींग लावली होती.

▪ सध्या कोल्हापूर उत्तरला महापौरपदाची संधी मिळाली असल्याने पुढील महापौर कोल्हापूर दक्षिणमधील होणार आहे. दरम्यान भाजप-ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.१० फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणूकीत आजरेकर यांचा महापौर पदावर शिक्कमोर्तब होईल.

Advertisements