नवजात बालकाला कोरोना

▪चीनमध्ये कोरोना व्हायरसने लागण झालेल्यांची संख्या 24 हजारांच्या वर गेली आहे तर मृतांची संख्या 500 वर पोचली आहे.

▪ व्हायरसचा हाहाकार सुरूच असून या त्याची सुरवात व केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरामध्ये नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये जीवघेण्या व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय.

▪ माध्यमांतील वृत्तानुसार, नवजात बालकाला आईच्या गर्भात किंवा जन्म झाल्यानंतर लगेचच संक्रमण झाल्याची शक्यता आहे. बालकाला जन्म देण्याआधी आईचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. चीनच्या सरकारी मीडियाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

▪ तज्ज्ञांनुसार ही घटना ‘व्हर्टिकल ट्रान्समिशन’चा प्रकार असू शकते. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आईद्वारे गर्भात किंवा बाळाच्या जन्मानंतर व्हायरसची लागण होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–