निपाणीत सात दिवस कडक लॉकडाऊन

▪️निपाणी तालुक्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढून मोठे संकट उभे राहू नये म्हणून निपाणीत शनिवारी तातडीची सर्वसमावेशक बैठक बोलविण्यात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित सर्वांची मते जाणून घेऊन बुधवार १५ पासून सात दिवस निपाणीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️रुग्ण व क्वारंटाईन संख्या वाढल्यास प्रशासनासमोर नियोजनाचे आव्हान निर्माण होणार आहे. यासाठी कोरोना संसर्ग साखळी तोडण्याकरिता बुधवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वस्तूंची खरेदी करण्याकरिता सोमवार व मंगळवारी मुभा दिली आहे.

▪️’कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. बाहेरील शहरातून गावी परतणाऱया प्रत्येकाची माहिती प्रशासनाला कळविण्याचे कर्तव्य पार पाडा. सात दिवस कडक लॉकडाऊन पाळून साखळी तोडण्याचे प्रयत्न करूया. यानंतर पुढची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.

▪️यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, सीपीआय संतोष सत्यनायक, आयुक्त महावीर बोरण्णावर, तालुकास्तरीय अधिकारी, नगरसेवक, नागरिक, व्यापारी व महिला उपस्थित होत्या.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–