महाराष्ट्राच्या राजभवनात तब्बल १६ जण पॉझिटीव्ह

▪️कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असतानाच महाराष्ट्राच्या राजभवनात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनातील तब्बल १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजभवनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

▪️राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तब्येत चांगली असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:चं विलगीकरण करून घेतलं आहे. राजभवनातील १०० लोकांची चाचणी केली गेली होती. त्यातील १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

▪️दरम्यान, संपूर्ण कोरोनाच्या काळात राजभवनावर नेत्यांची रीघ लागली होती, प्रामुख्याने सरकारच्या तक्रारी घेऊन विरोधी पक्ष असलेला भाजप आणि भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर खेटे घातले होते. तसंच या काळात राजभवनावर इतरही अनेकांची वर्दळ होती.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–