वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत द्या : उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या रविवार, 12 जुलै 2020 रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास येणाऱ्या हितचिंतकांना समक्ष न भेटता आपल्या शुभेच्छा दूरध्वनीच्या माध्यमातून द्याव्यात असे आवाहन केले आहे.

या दिवशी श्री. देसाई हे कोणासही व्यक्तिश: भेटणार नसून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणणाऱ्या हितचिंतकांनी ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्यात येणारी रक्कम प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या कार्यालयात जमा करण्यासाठी 9820313855 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती प्रबोधन गोरेगाव संस्थेने दिली आहे. 

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–