रेमडेसिवीर चे-21500 व्हायल्स येत्या आठवड्यात

महाराष्ट्रासाठी येत्या आठवड्यात रेमडेसिवीर या औषधाचे साधारणत: 21500 व्हायल्स उपलब्ध होणार असे उत्पादकांच्या प्रतिनिधीने या वेळी सांगितले. तसेच टोसीलीझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्याकारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुध्दा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करुन राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करावेत असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

मुंबई व ठाण्यामधील कार्यरत औषध निरीक्षक, सहायक आयुक्त (औषधे), सह आयुक्त (औषधे) यांची बैठक घेऊन या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश डॉ. शिंगणे यांनी  दिले आहेत.

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र या औषधांचा उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे.सध्या मे. हेट्रो रेमडेसिवीरचे उत्पादन हैद्राबाद येथे करीत आहेत व लवकरच नवसारी गुजरात येथे करणार आहेत. मे. सिप्ला यांचे रेमडेसिवीर चे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरु असुन भविष्यात गोवा येथे करणार आहेत. केंद्र शासनाकडून अनुमती मिळालेली आहे व यांचे उत्पादनसुध्दा बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या औषधाचा पुरवठा वाढण्यास मदत होईल.

सदर औषधे हे डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच रुग्णास प्रिस्क्राईब करावे. तसेच या औषधाच्या काळाबाजार करणाऱ्यांबाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक  1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–