रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब याचा पुरेसा साठा उपलब्ध

रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे महाराष्ट्रभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

डॉ. शिंगणे यांनी नुकतीच मुंबई शहरातील काही औषध वितरक व रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधाची उपलब्धता, त्यांचे वितरण व आकारण्यात येणारी किंमत याबाबत माहिती घेतली. यासंदर्भात त्यांनी आज अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकांचे प्रतिनिधी, वितरक/ विक्रेते यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सध्याचा उपलब्ध साठा, भविष्यात उपलब्ध होऊ शकणारा साठा तसेच वितरण प्रणाली व त्यातील दोष दूर करणे या बाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून केले जाते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी या औषधाची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सूचना डॉ. शिंगणे यांनी संबंधित कंपनीला दिल्या.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–