उत्तरायण किरणोत्सवाला सुरुवात

▪कोल्हापूर : वर्षातून दोनवेळा अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा होतो. तीन दिवसांच्या किरणोत्सव काळात सूर्यास्तावेळी सूर्यकिरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात.

▪यामध्ये पहिल्या दिवशी चरणांवर, दुसऱ्या दिवशी कमरेवर तर तिसऱ्या दिवशी संपूर्ण मूर्तीवर किरणे पडतात. अशाप्रकारे सूर्यास्ताच्या किरणांचा थेट अभिषेक होणारे अंबाबाई मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे. मंदिर बांधणीच्या वैशिष्ट्यामुळे हा सोहळा होतो.

▪उत्तरायण किरणोत्सवाला आज, गुरूवारपासून सुरूवात होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत किरणोत्सव सोहळा होणार आहे. आज पहिल्या दिवशी सूर्यास्ताच्या किरणांचा देवीला चरणस्पर्श होणे अपेक्षित आहे.

▪पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने, बुधवारी सायंकाळी किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किरणांच्या प्रखरतेची पाहणी करण्यात आली, यावेळी मावळतीची किरणे देवीच्या मुखापर्यंत गेल्याची नोंद झाली.

▪️महापालिकेच्यावतीने किरणोत्सव मार्गातील अडथळे हटवण्यात आले आहेत, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–