रितेश देशमुखच्या मुलांनी क्षणात जिंकली नेटकऱ्यांची मने

▪सैफ अली खानचा मुलगा तैमुरची प्रसिद्धी आपण पहिलीच आहे. तैमुर असो व महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा तसेच अशा अनेक स्टारकिड्सचे फोटो-व्हिडिओ टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच तयार असतात. स्टारकिड्स हे नेहमीच चर्चेचा व प्रसिद्धीझोताचा विषय ठरतात.

▪सध्या सोशल मीडियावर अशाच स्टारकिड्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील ही दोन मुलं आहेत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांची. राहील आणि रियान अशी रितेशच्या मुलांची नावं आहेत.

▪रितेश आणि जेनेलिया आपल्या मुलांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर यांचे फोटो टिपण्यासाठी थांबलेल्या फोटोग्राफर्सना रियान व राहील यांनी पाहिले तेव्हा दोघांनीही हात जोडून त्यांना प्रणाम केला. व हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि रितेशच्या मुलांचा हा अंदाज पाहून क्षणात नेटकऱ्यांची मने जिंकली व कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–