या तारखेपासून उघडणार धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल

▪केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

▪ धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे.

▪ ३० जून २०२० पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे.

1️⃣पहिल्या टप्प्यात काय उघडणार
▪ आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
▪ हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
▪शॉपिंग मॉल उघडणार.

2️⃣दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार

▪ शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.

3️⃣तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार

▪सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
▪ आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे
▪ सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
▪ क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–