जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना पडली महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

▪लॉकडाउनचा नियम मोडल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

▪आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इंडियन पिनल कोड कलम 188 अंतर्गत भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

▪सांगली जिल्ह्यातून परवानगी नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवमध्ये प्रवास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतर-जिल्हा प्रवेश करण्यास मर्यादा आणल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची प्रथमत: परवानगी घ्यावी लागते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–