नेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप

_सोशल मीडियावर शेरकर बद्दल संतप्त प्रतिक्रिया_

▪मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप त्याने केले आहेत.

▪सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेलं आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली. मी पळण्याचा प्रयत्न केला असता बंदूक घेऊन माझ्या मागे लागले आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला पकडून स्वतःच्या पाया पडायला लावलं तसेच जमीन चाटायला लावली आणि माझ्या पाठीवर तीन काठ्या फोडल्या, असं अक्षय बोऱ्हाडेनं आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.

▪मला पकडून माझं खोटं शुटिंग काढण्यात आलं. मी जे हो म्हणतो त्याला हो म्हण असं मला धमकावण्यात आलं. पैशाचा व्यवहार असल्याचं तुम्हाला सांगितलं जाईल, मात्र असा कोणताही व्यवहार नाही, असं अक्षयनं म्हटलं आहे.

▪दरम्यान, माझं खोटं वाटत असेल तर शेरकर यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ते कसे बंदूक घेऊन माझ्या पाठीमागे पळत होते, हे सगळ्यांना दिसेल. गरीबाचं पोरगं वर चाललेलं यांना पहावत नाही. जो त्यांच्यापुढे जाणार, त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणार यांना ते मारहाणच करणार. एवढंच नाही तर आजपासून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होईल, असंही त्याने म्हटलं आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–