समरजितसिंह घाटगे यांच्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडे विविध मागण्या

✍️सुरेश धनगर

▪️कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात शेतकरी संकटाच्या कचाट्यात अडकलेला आहे. यासाठी भाजप कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्य शासनाकडे शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या केल्या.

▪️यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्याला अनुदान मिळाले पाहिजे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्याला मोठे पॅकेज दिले पाहिजे.

▪️तसेच राज्य शासनाने महात्मा फुले योजनेत जे लाभार्थी आहेत व ज्यांची अगोदरची थकबाकी आहे अशांची कर्ज माफ करून त्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करून द्यावी असा जी.आर काढला आहे. पण प्रत्यक्षात खाजगी व शासकीय बँका शासनाने लागू केलेले सर्व नियम अमलात आणत नसतात म्हणून राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी केली.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–