आटपाडी तालुक्यातील पिंपरी (बु) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आटपाडी तालुक्यातील पिंपरी (बु) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.


कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे –

आटपाडी तालुक्यातील पिंपरी (बु) येथील

1) पूर्व – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून मुरलीधर अंतू पवार यांच्या घराच्या उत्तरेकडील कलढोण रस्ता

2) पश्चिम – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून लक्ष्मण यशवंत तरसे यांच्या घराच्या उत्तर बाजूकडील पडळकरवाडी कलढोल रस्ता

3) दक्षिण – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून जाधव मळा येथील विद्युतवाहिनी डीपी

4) उत्तर – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु. चौकातील पाण्याची टाकी, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.


बफर झोन पुढीलप्रमाणे –

1) पूर्व – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून उत्तरेकडील पडळकरवाडी – पिंपरी बु रस्ता, लक्ष्मण सखाराम पडळकर यांचे घर

2) पश्चिम – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून कलढोण रस्ता, लक्ष्मण यशवंत तरसे यांचे घर

3) दक्षिण – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु गावाचे संपूर्ण हद्द

4) उत्तर – दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु. गावठाण ओढ्यावरील पूल.

या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–