आज झारखंड व ओडीसाकडे 1 हजार 143 मजूर रवाना

आजअखेर 30 हजार 849 मजूर कोल्हापुरातून रवाना

कोल्हापूर : आजअखेर एकूण 23 रेल्वेमधून 30 हजार 849 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडीसाकडे रवाना झाले आहेत.


‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले झारखंडमधील बोकारो व ओडीसाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 143 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने रवाना झाले.


झारखंडमधील बोकारो व ओडीसाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये करवीरमधील 256,

कागलमधील 44,

गगनबावडामधील 6,

शिरोळमधील 21,

हातकणंगलेमधील 330,

गडहिंग्लजमधील 8,

चंदगडमधील 113,

इचलकरंजीमधील 193,

पन्हाळामधील 45,

शाहूवाडीमधील 6,

भुदरगडमधील 7,

राधानगरीमधील 6 व

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 108

असे एकूण 1 हजार 143 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–