लॉकडाउन काळात राज्यात सायबर गुन्हे वाढले : गृहमंत्री अनिल देशमुख

▪देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र या लॉकडाउन मध्ये अनेक नवनवीन समस्या निर्माण होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.

▪यामध्येच महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

▪जेव्हापासून महाराष्ट्रात लॉकडाउनला सुरुवात झाली, तेव्हापासून राज्यातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व टिकटॉकचे व्हिडिओ असतील, या सर्वांच्या माध्यामातून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणे, अफवा पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे इत्यादी सर्व चुकीच्या गोष्टी आहेत.

▪मध्यंतरी टिकटॉकच्या माध्यमातून बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यांसारख्या घटनांना प्रोत्साहन मिळेल, असे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

▪ या सर्वांवर महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाची करडी नजर आहे. जो कोणी अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकेल त्याच्याविरोधात कठोरातली कठोर कारवाई महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून केली जाईल. असा इशाराही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–