इचलकरंजीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; तीन जण पॉसिटीव्ह

▪️गेले सलग तीन दिवस निगेटिव्ह रिपोर्टसची हॅट्ट्रिक साधल्यानंतर आज शुक्रवार, दि. २२ रोजी तीन पॉसिटीव्ह रुग्ण आढळल्याने वस्त्रनगरीत खळबळ उडाली.

▪️आज संध्याकाळी जिल्ह्यातील एकूण 23 रिपोर्टस पॉसिटीव्ह आले त्यापैकी शहरातील शहापुरमधील कृष्णनगर भागातील तीन रिपोर्टस पॉसिटीव्ह आले. यामध्ये 28 वर्षीय महिला, त्या महिलेची 8 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे.

▪️हे तीनही जण सोलापूरहून इचलकरंजीमध्ये आले होते. सध्या ते शहराबाहेरील एका संस्थात्मक विलगिकरन कक्षात आहेत.

▪️कालपर्यंत इचलकरंजी शहर कोरोना मुक्त होते. या पूर्वीच्या तीन पॉसिटीव्ह रुग्णांपैकी एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर एक लहान मुलगा व एका वृद्धाने कोरोनावर मात केली होती.

▪️गेले तीन दिवस मिळालेले सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने इचलकरंजीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता पण आज कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–