कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझीटिव्ह संख्या 250 पार; शाहूवाडीत सर्वाधिक पॉझिटिव्ह

कोल्हापूर – आज दिवसभरात 1001 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल पॉझीटिव्ह तर 874 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 96 अहवाल अप्राप्त आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 259 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 81 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.


आज दिवसभरात आलेल्या 31 पॉझीटिव्ह अहवालामध्ये,

भुदरगड-1,

चंदगड-4,

गडहिंग्लज- 8,

गगनबावडा-1,

हातकणंगले-2,

पन्हाळा -1,

राधानगरी-6,

शाहूवाडी-3,

शिरोळ-1,

नगरपरिषद क्षेत्र -3,

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र-1, असा समावेश आहे.


आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –

आजरा- 13,

भुदरगड- 24,

चंदगड- 17,

गडहिंग्लज- 13,

गगनबावडा- 5,

हातकणंगले- 3,

कागल- 1,

करवीर- 10,

पन्हाळा- 14,

राधानगरी- 42,

शाहूवाडी- 81,

शिरोळ- 5,

नगरपरिषद क्षेत्र- 10,

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-17

असे एकूण 255 आणि

मुंबई -1,

कर्नाटक-२ आणि

आंध्रप्रदेश-1

इतर जिल्हा व राज्यातील 4

असे मिळून एकूण 259 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–