त्या कुटुंबाचा आधार बनल्या ,सरपंच छायाताई थोरात

विकास मस्के/तासगाव प्रतिनिधी :

■ वासुंबे येथे परवा झालेल्या वादळी पावसात वासुंबे येथील संजय विश्वनाथ शिरतोडे यांच्या घरातील आड्याला बांधलेल्या पाळण्यात असलेले बाळ वाऱ्याच्या जोराने पत्रा उडालामुळे त्या पत्र्या सॊबत बाळाचा पाळणा देखील उडून बाहेर दूरवर जाऊन पडला,आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि त्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला.

■ या घटनेने संपूर्ण गाव भावुक झाले.या दुर्दैवी घटनेने त्या कुटुंबावर मोठा आघात झाला.आज कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे काम सर्वजण करत आहेत.सामाजिक भान असलेल्या वासुंबे गावच्या सरपंच सौ छायाताई थोरात यांनी त्या कुटुंबाला 1 महिना पुरेल इतका किराणा बाजार दिला व सामाजिक बांधलकी जपण्याचे काम करून मानसिक आधार दिला.

■ यावेळी उपस्थित शीतल हाक्के, मंगेश एडके, प्रणव शिरतोडे तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–