आजअखेर 29 हजार 706 मजूर कोल्हापुरातून रवाना

▪कोल्हापूर : आजअखेर एकूण 22 रेल्वेमधून 29 हजार 706 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.

▪‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील इटावाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 447 मजूर तर 882 मजूर सायंकाळी 6 वाजता श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.

▪उत्तरप्रदेशमधील इटावाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये हातकणंगलेमधील 430, करवीरमधील 70, इचलकरंजी मधील 400, आजरामधील 60, कागलमधील 60, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 400 व इतर भागातील 27 असे एकूण 1 हजार 447 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.

▪बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये गडहिंग्लजमधील 11, हातकणंगलेमधील 351, इस्लापूरमधील (सांगली) 61, इचलकरंजीमधील 233, कागलमधील 43, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 43 व करवीरमधील 140 असे एकूण 882 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–