राम मंदिराच्या कामाला सुरुवात; खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती व नक्षीदार खांब

▪राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, जागेचं सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहे.

▪ मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.

▪ विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय म्हणाले,”मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,”

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–