कोल्हापूरला दिलासा : 1638 जणांचे अहवाल निगेटिव्ह

▪कोल्हापूर – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांची वाढलेल्या संख्येमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण झाले होते.

▪ पण काल दि.20 मे रोजी रात्री 8.30 पर्यत 1295 आणि आज सकाळी 10 वाजेपर्यंत 343 असे एकूण 1638 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी ठरली आहे.

▪जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पीटलसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय घोडावत हॉस्टेल, अॅपल हॉस्पीटल आणि आधार हॉस्पीटल या एकूण 18 ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–