शिरोळ तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ आणखी चार कोरोना बाधित…

✍️ कुणाल कांबळे

■ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, तेरवाड, अकिवाट आणि घोसरवाड या गावात प्रत्येकी एक असे एकूण चार कोरोनाचे रुग्ण बुधवारी आढळून आले. त्यांना उपचारासाठी तात्काळ सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

■ त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता आठ वर पोहचली आहे. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज आढळलेले चार रूग्ण मुंबई,सोलापूर,हरियाणा या ठिकाणाहून आलेले आहेत.या चौघांनाही अलगीकरणात ठेवण्यात आले होते.आढळून आलेल्या चार रुग्णांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

■ कुरुंदवाड व घोसरवाडमधील महिला असून त्या मुंबईहून आल्या आहेत.अकिवाटचा युवक हरियानातून आलेला आहे तर तेरवाडचा युवक सोलापूर या ठिकाणाहून आलेला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–