अम्फनचं रौद्र रूप; वेगवान वाऱ्यासह पावसाचा तडाखा, १२ जणांचा मृत्यू

▪महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून पश्चिम बंगालमध्ये ताशी १९० कि.मी वेगाने प्रवेश केला आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील १२ जणांचा बळी घेतला आहे.

▪ अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी जिल्ह्य़ांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० कि.मी. आणि ओडिशातील पारादीपपासून ५२० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात या वादळाचे केंद्र असून ते ताशी १४ कि.मी. वेगाने उत्तरपूर्वेकडे सरकत आहे.

▪राष्ट्रीय आपत्ती दलाची ४१ पथके दोन राज्यात तैनात केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

▪पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत. सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–