एकाच दिवसात १२०२ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–