आज बुधवार नवीन १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

▪️कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज, बुधवारी १९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५५ वर पोहोचली आहे.

▪️जिल्ह्याचे टेन्शन वाढत चालले आहे. मंगळवारी दिवसभरात ५३ नव्या रुग्णांची भर पडली. एकाच दिवशी बाधितांची ही सर्वोच्च संख्या ठरली होती. यामुळे काल जिल्ह्यातील रुग्णसंख्या १३६ झाली होती. त्यात आज, बुधवारी आणखी १९ रुग्णांची भर पडली.

▪️पॅरोलवर सुटका झालेल्या मादळे (ता. करवीर) येथील कैद्याचाही अहवाल काल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ येथील आणि शाहूवाडी तालुक्यातील मोसम येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

▪️ गोकुळशिरगाव मधील एक कंटेनर चालक, पाचगाव परिसरातील दोन लहान मुलींसह तिच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने हा तालुका हॉट स्पॉट होण्याची शक्यता वाढली आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–