अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना दिले ५०० स्मार्टवॉच

▪बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सातत्याने करोना योद्धांना मदत करत आहे. मुंबई पोलिसांसोबतच आता त्याने नाशिक पोलिसांसाठीही ५०० स्मार्टवॉच दिले आहेत.

▪या स्मार्टवॉचद्वारे पोलिसांमध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास मदत होईल. याआधी त्याने मुंबई पोलिसांना एक हजार असे स्मार्टवॉच दिले होते. नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या मदतीबद्दल अक्षयचे आभार मानले.

▪या मदतीविषयी विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “मी अक्षय कुमार यांचे खूप आभार मानतो. ४५ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पोलिसांना हे स्मार्टवॉच दिले जातील. हे घड्याळ मनगटाला बांधल्यास शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यांचा डेटा कोविड डॅशबोर्डवर जमा केला जाईल. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देता देईल.”

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–