क्वारंटाईन असलेली व्यक्तीच चक्क अंबाबाई मंदिरात

▪️कोल्हापूर: कोल्हापुरात होम क्वारंटाईन असलेली व्यक्तीच चक्क अंबाबाई मंदिरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होम क्वारंटाइनमधील पुजारी मंदिरासमोरील देवालयात पूजा करण्यासाठी आल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमुळं उघडकीस आल्यानंतर यंत्रणेची तारांबळ उडाली.

▪️मात्र, अनेकदा आवाहन करुनही काही लोक परिस्थितीच गांभीर्य न समजता समाजात वावरत होते. त्यामुळे अखेर सरकारला संपूर्ण देशाला 21 दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आलं. त्यानंतरतरी नागरिक घरात राहातील अशी आशा मोदींनी व्यक्त केली.

▪️मात्र, देशात लॉक डाऊन झाल्यानंतरही नागरिक ऐकायला तयार नाहीत. सामान्य व्यक्तीच नाही तर ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे, तेही समाजात वावरत आहे.

▪️होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर असतानाही एक व्यक्ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेली. पूजेच्या साहित्यासह गरुड मंडपात गेलेल्या या व्यतीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला थेट उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात दाखल केलं. तसेच, या बेजबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–