बाळू मामांच्या नावाने फिरत असलेली कोरोनो बद्दलची भाकणुक ही निव्वळ अफवा

▪️पुणे : “संत बाळूमामा यांच्या नावाने कोणीही अफवा पसरवू नका. सरकार जे सांगत आहे ते ऐका. कोरोनावर कोणत्याही प्रकारचे औषध बाळू मामा यांच्या भाकणुकीत सांगितलेले नाही,”असे आदमापूर, जि. कोल्हापूर येथील संत बाळू मामा ट्रस्टने सांगितले आहे.

▪️मध्यरात्री बारा वाजता काळा चहा हळदीपूड टाकून पिल्याने कोरोना रोग बरा होतो, अशी भाकणूक आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या मंदिरात झाली, “संत बाळू मामा यांच्या मुर्तीच्या डोळ्यातून पाणी आले आहे. समाधी हलली आहे, “अशा अफवा उठल्या आहेत, मात्र तसे काही झालेले नाही. अशा चुकीच्या मेसेज वर कुणी विश्वास ठेवू नये. तसेच असे मेसेज पुढे पाठवू नये ” असे आवाहन ट्रस्ट वतीने केले आहे.

▪️ग्रामीण भागात ही अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. बाळू मामा यांच्यावर श्रद्धा असलेला मोठा वर्ग ग्रामीण महाराष्ट्रात आहे. या अफवेमुळे लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र त्याबाबत मगदूम यांनी स्पष्टीकरण करत “अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे आवाहन करण्यात आले आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–