लोकांवर यापुढे लाठीची कारवाई केल्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही. : अनिल देशमुख

▪️करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दि. 24 मार्च 2020 रोजी रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधत, पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन करणार असल्याचं सांगितले आहे. तुमचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, घराबाहेर पडलो तर करोनाचं सकंट अधिक गडद होईल, आणि हे मी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या घरातील एक व्यक्ती म्हणून सांगत आहे; असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

▪️या काळात जीवनावश्यक सेवांचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही; पडू नये. महाराष्ट्रातही पोलिस कर्मचारी गेले काही दिवस या नियमाचं काटेकोर पालन करताना दिसत आहे. जनता कर्फ्यू पासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिस लाठीने चोप देत आहेत.

▪️ प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही लोकं घराबाहेर पडत आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना खास आदेश दिले आहेत. “यापुढे लाठीचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, देशाचे पंतप्रधान वारंवार घराबाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत. तरीही समाजातील काही ५-१० टक्के लोकं घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांसाठी पोलिसांनी हातात लाठी घेऊन तयार रहावं. लाठीला तेल लावून अशा लोकांवर कारवाई केल्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही.” एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात अनिल देशमुख बोलत होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–