घरफाळा संदर्भात डी.वाय.पी मॉलची ची प्रशासनाने चौकशी करावी – काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख

▪कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण माजी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे चांगलेच तापले आहे.या पत्रकार परिषदेत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महानगरपालिका घरफाळा च्या माध्यमातून सुमारे दहा कोटींचा दरोडा टाकल्याचा आरोप करत कागदपत्रे सादर केली आहेत.

▪सुमारे दहा कोटींची घरफाळा चोरी सयाजी हॉटेल व मॉल च्या माध्यमातून केली असल्याचे आरोप महाडिक यांनी केले असून ही चोरी ही संबंधित प्रॉपर्टी मालक वापर म्हणून दाखवून त्या मालक वापरला असणारा कमी फाळा भरला आहे पण यातील २४ प्रॉपर्टी वेगवेगळ्या वेंचर ना भाडे तत्ववार दिली आहे. त्यामूळे भाडे तत्वावर दिल्यावर जो जास्त फाळा भरावा लागतो तो त्यांनी चुकवत प्रशासनाला फसवून दरोडा टाकण्याचे काम सतेज पाटील यांनी केले असल्याचे मत महाडिक यांनी व्यक्त केले आहे. याच बरोबर कोल्हापूर करांनी देखील जोपर्यंत सयाजी हॉटेल व मॉल चा घरफाळा भरला जात नाही तोपर्यंत कुणीही घरफाळा भरू नये असे आव्हान केले आहे.

▪या सर्व प्रकरणावर काँग्रेस चे गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकारांच्या पुढे मांडत महानगर पालिकेने सयाजी हॉटेल घरफाळा बाबत चौकशी करावी तसेच महाडिक यांनी केलेलं सर्व जुनेच आरोप आहेत निवडणुकीच्या तोंडवर हेच आरोप करत असतात असे देखील मत त्यांनी व्यक्त केले आहे. याच बरोबर प्रशासनाच्या मागणी प्रमाणे घरफाळा भरला असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–