मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं प्रकरणी ATS यंत्रणा तपास करणार

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास करण्यात येणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधान सभेत सांगितलं.

मात्र स्फोटकं आढळलेल्या वाहनाचे कथित मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल संशयास्पद स्थितीत आढळल्यानं, हे प्रकरण अधिक गंभीर झालं असून, त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–