मुख्य रस्त्यावरती जलवाहिनीला गळती, मुख्य रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता.

आजरा प्रतिनिधी :

आजरा येथील संभाजी चौक मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती झाल्याने रस्त्यावर पाणी येत आहे. आजाऱ्याच्या मुख्य संभाजी चौक येथे मोठी वर्दळ असते त्याच ठिकाण मोठा खड्डा पडला आहे.वाहन चालकांना खड्डाचा अंदाज येत नाही.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

गेले दोन दिवस पाणी गळती सुरु असून नगरपंचायतीने या कडे साफ दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

पावसाळ्यामध्ये साठणाऱ्या पाण्या मुळे मागील वर्षी केल्या गेलेल्या गटारी त्यामुळे मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली संबंधित विभागाने तातडीने खड्डा आणि पाणी गळती दुरूस्ती करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

पाणी गळती मुळे गढूळ पाणी येत असल्याची काही लोकांचे म्हणणे आहे त्या मुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. गेले दोन दिवस नगरपंचायतीचे कोणीही कर्मचारी इकडे फिरकले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–