झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ३ जवान शहीद

झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील होयाहातु गावाजवळच्या जंगलात आज सकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात झारखंड जग्वारचे 3 जवान शहीद झाले तर अन्य दोघे जवान गंभीर जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 197 बटा लियनचा एक जवानही गंभीररीत्या जखमी झाला आहे.

या स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी सुधारित शक्तिशाली स्फोटकांचा वापर केल्याचं वृत्त आहे. गेल्या 10 दिवसातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला हा दुसरा, तीव्र क्षमतेचा स्फोट आहे. जखमी जवानांना रांची इथं उपचारासाठी हलविण्यात आल आहे. राज्य पोलिस दल आणि सीआरपीएफच्या 197 बटालियनच्या वतीने या भागात शोध मोहीम सुरु होती. सध्या पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अधिक वृत्ताची प्रतीक्षा आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–