शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने

कोल्हापूर ता.23: सोमवार दिनांक 22.02.2021 रोजी जुने व नवीन आपटेनगर येथील विद्युत पुरवठा महापारेषण/ महावितरण कंपनीकडून त्यांच्या दुरूस्ती कामासाठी दुपारी 12.00 ते 5.00 या वेळेत बंद झाल्याने सदर पंपींग स्टेशनवर अवलंबून असणारा भाग तसेच पुईखडी टाकीवर अवलंबून असणा-या भागास सोमवार दिनांक 22.02.2021 रोजी दुपारच्या सत्रामध्ये दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

तसेच कोल्हापूर शहरातील ए, बी,  व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना कळविणेत येते की, शिंगणापूर योजनेवरील पाचवा पाणी उपसा पंप नादुरूस्त झाल्याने सदर पंप दुरूस्तीचे काम हाती घेणेत आले आहे. पंप दुरूस्तीसाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार असलेने पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवारपेठ परिसर, शिवाजीपेठ परिसर, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसा परिसर, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर परिसर, बापुराम नगर परिसर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवलेमळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसर, राजीव गांधी परिसर, जरगनगर परिसर, गंजीमाळ, रामानंदनगर परिसर, नाळे कॉलनी परिसर, विजयनगर परिसर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी परिसर, वर्षानगर, भारतनगर परिसर, सुभाषनगर पंपींगवरील ग्रामिण भाग, पाचगाव परिसर, आर.के.नगर परिसर, पुईखडी परिसर, जिवबानाना परिसर, विशालनगर, आयसोलिएशन परिसर, वाय.पी.पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी परिसर, पोस्टलकॉलनी परिसर, आर.के.नगर परिसर, जरगनगर ले आऊट, ई वॉर्ड राजारामपुरी वितरण – संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू मिल परिसर, वैभव हौसिंग सोसायटी परिसर, ग्रीनपार्क परिसर, शांतीनिकेतन परिसर, रेव्हेन्यु कॉलनी परिसर, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर परिसर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर परिसर, प्रतिकानगर परिसर, इंगळेनगर परिसर, दौलतनगर परिसर उद्यमनगर परिसर, शास्त्रीनगर परिसर, पांजरपोळ परिसर,  नवश्या मारूती चौक परिसर, दत्तगल्ली परिसर, यादवनगर परिसर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर परिसर, पायमल वसाहत परिसर, अंबाई डीफेन्स प‍रिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ, ई वॉर्ड कावळानाका – लोणार वसाहत, शाहुमिल कॉलनी परिसर, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी परिसर, लिशा हॉटेल परिसर, शिवाजीपार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहुपूरी व्यापारपेठ, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर इत्यादी भागातील नळ कनेक्शनधारकांना सदर कालावधीमध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा काही ठिकाणी व उंचावरील भागामध्ये अपुरा व कमी दाबाने होईल तसेच काही भागात होऊ शकणार नाही.

संबंधीत भागातील नागीकांना दैनंदिन पिण्याचे पाणी पुरवठा होणेचे दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. तरी नळ कनेक्शनधारकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–