नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई- सांगली जिल्हाधिकारी

कोरोनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचे पालन न करणाऱ्या आस्थापनंवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. मंगल कार्यालये, सभागृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मॉल्स यांना 20 हजार रूपये तर जिमखाना, हॉटेल्स/बार/रेस्टॉरंट, कोचिंग क्लासेस, सुपरमार्केट या आस्थापनांना 10 हजार रूपये दंडाची रक्कम निश्चित केली आहे.

शासनाकडील मागदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीच्या अधिन राहून जिल्ह्यातील जिमखाना, मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स/बार/रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, मॉल्स, बाजार, मंडई, कोचिंग क्लासेस, धार्मिक स्थळे, क्रीडांगण, बागा, सर्व खाजगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

सद्यस्थितीत कोविड-19 च्या रूग्ण संख्येत वाढ होत असताना सदर आस्थापना नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आस्थापनांमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

नियमभंग करणाऱ्या आस्थानांवर फौजदारी कारवाई बरोबरच दंडात्मक कारवाई होण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दंडाची रक्कम निश्चित केली आहे.

ही कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य उत्पादन शुल्क विभाग व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–