इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार ऑफलाईन

इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टं केलं.

चेंबूर इथं झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  परिक्षा कशा पद्धतिनं घेतल्या जातील या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टं केलं.

काही ग्रामीण भागात अजुनही इंटरनेटची सुविधा नाही, तसंच अजुनही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखाची असल्यानं त्यांच्याकडे साधन सुविधा नसल्यानं ऑनलाईन परिक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परिक्षा ऑफलाईन पद्धतिनंच घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.  

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–