जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम; सांगली महापौर पद राष्ट्रवादीकडे

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर व उप महापौर निवडणूूकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला धक्का दिला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारत दिग्विजय सूर्यवंशी यांना विजयी केले आहे.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांनी अर्ज भरला होता.

भाजपच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले.

दरम्यान, सांगली महापालिकेत भाजपकडे 43 काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी आपल्या ‘होमग्राऊंड’मध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला.

सोशल मीडियावर हि जयंत पाटील यांचीच हवा…

आज सकाळी महापौर व उपमहापौर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जयंत पाटलांच्या एका मुलाखतीतील “टप्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम’ करतोच” या डायलॉग चा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–